जालना- जागतिक सायकल दिनाच्या औचित्य साधून आय.एम.ए.जालना तर्फे दोन जून रोजी ग्रीन राइड सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल चालवल्याने हृदयाची शक्ति वाढते, पचन क्रिया सुधारते , तसेच आपली प्रतिकारशक्ती आणि एकंदरीतच आपले शरीर निरोगी राहण्यासाठी सायकल चालवणे खरोखरच फायद्याचे ठरते.
या व्यायाम प्रकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे अगदी सोपा आणि मोफत असलेला हा व्यायामाचा प्रकार समस्त जनतेमध्ये रुजावा आणि जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी. मधुमेह आणि रक्तदाब या सारखे आजार सुद्धा सायकल चालवल्याने नियंत्रणात राहतात. त्यामुळे सर्वांनी सायकल चालवावी असे आवाहन आय. एम. ए. जालना तर्फे करण्यात आले आहे.
ही सायकल रॅली दिनांक 2 जून 2024 रविवार रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरु होईल. कुटुंब व मित्रांसोबत या रॅली मध्ये सहभाग घ्यावा व आपले आरोग्य निरामय राखण्यासाठी प्रयत्न करावेत. सोबत दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून आपण गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे. रॅली निशुल्क आहे पण क्यू आर कोड स्कॅन करून नोंदणी करणे गरजेचे आहे. पांजरा पोळ या ठिकाणी रॅलीचा समारोप सकाळी 8.30 वाजता होईल.
या अभिनव उपक्रमात आपण सहभागी व्हावे असे अवाहन आय. एम. ए. जालनाचे अध्यक्ष डॉक्टर श्री संभाजी मुंडे व सचिव डॉक्टर श्री आनंद बोरिवले यांनी केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172