जालना- शहरातील मोती तलावाच्या काठावर एक धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणाच्या बाजूलाच भर टाकून हा हा तलाव बुजविल्या जात असल्याचा एक व्हिडिओ कालपासून समाज माध्यम आणि अनेकांच्या व्हाट्सअप ग्रुप वर फिरत होता.
ही भर टाकून या प्रार्थना स्थळाचे महत्व आणि व्याप्ती वाढविण्याचा तर प्रयत्न नाही ना? अशी शंका अनेकांच्या मनात उत्पन्न झाल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची ही शक्यता निर्माण झाली होती. याचा रोष जालना शहर महानगरपालिकेच्या माथ्यावर फोडल्या जात होता. कारण एवढे अतिक्रमण होत असतानाही मनपाचे दुर्लक्ष कसे? हा सर्वांचाच प्रश्न होता. या संदर्भात www.edtvjalna.com ईडीटीव्ही न्यूज कडे देखील अनेक जणांनी हा व्हिडिओ पाठवला आणि या प्रश्नाला वाचा फोडावी अशी मागणी केली. त्यावेळी सत्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता इथे काय होत आहे याची सविस्तर माहिती मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172