Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » कोविडचा फटका; भावी डॉक्टरांच्या अभ्यासक्रमासाठी उसने मृतदेह !; किती लागणार दरवर्षी मृतदेह पहा?
    Jalna District

    कोविडचा फटका; भावी डॉक्टरांच्या अभ्यासक्रमासाठी उसने मृतदेह !; किती लागणार दरवर्षी मृतदेह पहा?

    EdTvBy EdTvDecember 3, 2024Updated:December 3, 2024No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- कोविडच्या 2021 ते 2023 या कालखंडामध्ये मृतदेहांचे ढीगच्या ढीग लागलेले होते. अंत्यविधीसाठी देखील प्रतीक्षा करावी लागत होती . त्याच कोविडमुळे भावी डॉक्टरांना अभ्यासासाठी उसने मृतदेह आणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाच मानवी शरीराच्या हातापासून सुरू होतो त्यामुळे जर पूर्ण मृतदेह नाही मिळाला तर एका हातापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. सामान्य वेळी एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी आपण बारा तासाच्या आसपास करतो. परंतु डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र एक मृतदेह वर्षभर अभ्यासक्रमासाठी वापरला जातो आणि हा मृतदेह दहा विद्यार्थ्यांमध्ये असतो. एकीकडे कोविडमुळे घटलेले मृतदेह आणि दुसरीकडे चालू वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयांची वाढलेली संख्या या विरोधाभासामुळे आता अशी महाविद्यालये पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून बेवारस मृतदेह मिळविण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना देहदान करण्यासाठी जनजागृती करण्याच्या तयारीत आहेत.

    जालना जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिनांक एक नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाले आहे.  शंभर विद्यार्थी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहेत. या अभ्यासक्रमाची सुरुवातच चार विषयांमध्ये सुरू होते त्यापैकी पहिली शरीर रचना, शरीर क्रिया, जीव रसायनशास्त्र, आणि चौथे जन औषधी वैद्यक शास्त्र. त्यामुळे पहिल्याच वर्षी पहिल्याच अभ्यासक्रमाला शरीर रचना हा विषय असल्यामुळे मानवी शरीराची रचना आणि त्याची क्रिया जाणून घेण्यासाठी मृतदेहाची आवश्यकता असते. दहा विद्यार्थ्यांमध्ये एक मृतदेह  दिला जातो. विशेष म्हणजे या मृतदेहावर अशी काही प्रक्रिया केली जाते की तो मृतदेह पूर्ण वर्षभर हे विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग आणि अभ्यास करण्यासाठी वापरतात. असे मृतदेह ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे आणि कायदेशीर बाबी देखील तपासून पाहाव्या लागतात. त्यासाठी शासनाच्या वतीने नुकतीच तीन सदस्यांची एक समिती येऊन गेली आहे आणि त्यांनी त्यांचा अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालामध्ये मृतदेहाचे श्रविच्छेदन ,परिवहन ,जतन आणि निरलेखन म्हणजेच विल्हेवाट या पाच बाबींचा समावेश असतो .या बाबींची पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना मृतदेह उपलब्ध करून दिली जातात. तूर्तास जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सध्या छत्रपती संभाजी नगर आणि परभणी येथून मृतदेह आणून अभ्यासक्रम सुरू आहे. परंतु लवकरच इथे मृतदेह ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर जालना महाविद्यालयाला देखील दरवर्षी दहा मृतदेहांची व्यवस्था करावी लागणार आहे आणि अद्याप पर्यंत देह दानासाठी नागरिक म्हणावे तसे जागृत झाले नाहीत .त्यामुळे अनेक वेळा बेवारस मृतदेहांची विल्हेवाट पोलीस लावतात ती विल्हेवाट न लावता तो मृतदेह विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

    एकूणच मागील महिनाभरापासून जालना शहरात सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी आढावा सांगताना सांगितले की अधिष्ठाताच्या नावावर 26 एकर जागा शासनाने केली आहे आणि केंद्र शासनाची उप कंपनी असलेल्या ब्रिज अँड रूप यांना व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार निविदा जाहीर करण्यात आली आहे आणि अहमदाबाद येथील यशानंद कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले आहे. 403 कोटी 89 लाख रुपयांची ही निविदा आहे तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या मृतदेहाबद्दल शरीर रचना शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी देखील सविस्तर माहिती दिली आहे.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
    -दिलीप पोहनेरकर-9422219172

    abp Analyser bjp blog Breaking news covid-19 cricel marathi crime deen Ed News gov jalna crime jalna distric jalna live jalna nic jalna sp jalna zp job maharashtra news marathi janta mcn multistate news political politics prati paksha pudhari sant krupa tv9 जालना बातम्या दिवाळी देवाभाऊ नेता पक्ष पुढारी बोल भिडू रणरागिणी राजकारण लोकशाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेडलाईन्स
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleवाईट संपविण्यासाठी संघर्षाची वृत्ती सोडू नका-डॉ. सोमीनाथ खाडे
    Next Article “त्या” व्हायरल व्हिडिओ ने वाढवली पोलीस आणि मनपा प्रशासनाची डोकेदुखी; पहा कोणता होता तो व्हिडिओ,पुढे काय झालं!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,001 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,174 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    दुष्काळात तेरावा महिना;रोहित्र(DP) जळताना कधी पाहिला आहे?

    May 21, 2025520 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.