Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शिक्षण विभागाची “शाळा”; 31 शिक्षकांना दिलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की

    ब्रेनला ट्रेंड करा- सहआयुक्त अंजली धानोरकर

    CEO मॅडम! अधिकारी तुमची दिशाभूल करत आहेत; 23 कोटींच्या भ्रष्टाचाराचे पाणी कुठे? कुठे? मुरलं

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » बालविवाह; “सावधान” चे मुहूर्त साधाल तर त्याच मुहूर्तावर पडतील हातकड्या
    Breaking News

    बालविवाह; “सावधान” चे मुहूर्त साधाल तर त्याच मुहूर्तावर पडतील हातकड्या

    EdTvBy EdTv26/04/2025No Comments2 Mins Read3 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगती पथावर आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये बालविवाहाची प्रथा बंद झालेली नाही. या बालविवाहा मुळे भविष्यात अनेक समस्यांना दोन्ही कुटुंबांना तोंड द्यावे लागते आणि असे बालविवाह चोरीछुपया मार्गाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात लावल्या जात. कारण साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे आणि ते बुधवार दिनांक 30 रोजी आहे. त्यामुळे या दिवशी  लावण्यात येणारे बालविवाह शुभमंगल सावधान म्हणताच हे सावधान याच मुहूर्तावर आपल्या हातात हातकड्या पडण्यासाठी देखील कारणीभूत होऊ शकते.

    शासनाने मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 हे विवाहासाठी निर्धारित केलेले आहे. या वयापूर्वी लावण्यात येणाऱ्या विवाहांना बालविवाह म्हणून संबोधल्या जाते आणि त्यामुळेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, बालक हक्कापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने या कायद्याची अंमलबजावणी केल्या जाते. परंतु अनेक जण कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलीचा बालविवाह करण्याच्या  आणि जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रकारची कृती ही कायद्याच्या विरोधात आहे .त्यामुळे असे लग्न लावताना जर वधू-वरांचे पालक जर कायद्याच्या चौकटीत सापडले तर त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते .त्यामुळे वधू-वराच्या पालकांनी बालविवाह लावू नयेत असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती कोमल कोरे- चाटे यांनी केले आहे .दरम्यान अशा प्रकारचे कुठे विवाह लागत असतील तर त्या संदर्भात संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन ,जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी, तसेच चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ पोलिसांच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

    ही आहेत साडेतीन मुहूर्त गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा हे तिन्ही पूर्ण मुहूर्त समजल्या जातात आणि दीपावलीची बलिप्रतिपदा याला अर्ध मुहूर्त समजले जाते. असे एकूण साडेतीन मुहूर्त आहेत ज्या मुहूर्तांसाठी नागरिक वर्षभर वाट पाहत बसतात.

    सविस्तर बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी www. edtvjalna.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा युट्युब ला सबस्क्राईब करा.
    दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    1098 112 jalna जालना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बालविवाह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 साडेतीन मुहूर्त अक्षय तृतीया
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleजेईएस मध्ये “वसंतोत्सव”; मृगनयनी भगिनी फुलविणार भरतनाट्यम चा पिसारा तर 30 जणांचा संच करणार “घोळ मटन”
    Next Article जालन्यात पाच पाकिस्तानी नागरिक पण…!
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    शिक्षण विभागाची “शाळा”; 31 शिक्षकांना दिलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की

    09/12/2025

    ब्रेनला ट्रेंड करा- सहआयुक्त अंजली धानोरकर

    07/12/2025

    CEO मॅडम! अधिकारी तुमची दिशाभूल करत आहेत; 23 कोटींच्या भ्रष्टाचाराचे पाणी कुठे? कुठे? मुरलं

    05/12/2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,066 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,105 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,236 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,215 Views
    Don't Miss
    Breaking News 09/12/2025

    शिक्षण विभागाची “शाळा”; 31 शिक्षकांना दिलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की

    जालना- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने 31 शिक्षकांना नियुक्त दिल्या होत्या. नियमबाह्य आणि’ दे मला नही…

    ब्रेनला ट्रेंड करा- सहआयुक्त अंजली धानोरकर

    CEO मॅडम! अधिकारी तुमची दिशाभूल करत आहेत; 23 कोटींच्या भ्रष्टाचाराचे पाणी कुठे? कुठे? मुरलं

    धर्म ध्वज वर जात असतांनाचा ते अनुभव सांगत होते, आणि आसमंत ऐकत होता

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शिक्षण विभागाची “शाळा”; 31 शिक्षकांना दिलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची नामुष्की

    ब्रेनला ट्रेंड करा- सहआयुक्त अंजली धानोरकर

    CEO मॅडम! अधिकारी तुमची दिशाभूल करत आहेत; 23 कोटींच्या भ्रष्टाचाराचे पाणी कुठे? कुठे? मुरलं

    Most Popular

    महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जमा झाला 166 बॅग रक्त साठा

    01/05/20210 Views

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.