जालना -ग्रामसेवकांनी चांगले कामे करून पुरस्कार मिळवले पाहिजेत, ज्यामुळे ग्रामपंचायतचे ,गावाचे आणि आपलेही नाव उज्वल होते. यावर्षी जर ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले नाहीत तर पुढच्या वर्षी मी तुमच्या कार्यक्रमाला येणार नाही अशा शब्दात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू,यांनी ग्रामसेवकांची कान उघडणे केली .

जालना जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2023- 24 आणि सन 2024 -25 या कार्यकालातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक अशा एकूण आठ ग्रामसेवकांची निवड केल्या जाते दोन वर्षाच्या 16 ग्रामसेवकांना या भरगच्च कार्यक्रमांमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांसह ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष निकम यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला ज्यामध्ये जिल्हा परिषद अतर्गत सर्व
च विभागातील महिलांनी उत्स्फूरपणे प्रतिसाद घेतला याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेनू यांनी देखील महिलांच्या आग्रहाखातर नृत्यांमध्ये भाग घेतला आणि आनंदात भर घातली . या दोन्ही कार्यक्रमाचे सविस्तर चित्रीकरण आणि बातमी पहा वरील व्हिडिओमध्ये.
सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
