जालना- अवघ्या दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाची पहिली तुकडी बाहेर पडली. याच पहिल्या तुकडीने म्हणजेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुन 1999 चा अधिनियम क्रमांक 33 नुसार रॅगिंगला पूर्णता बंदी आहे .एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची शिक्षा देखील केल्या जाऊ शकते . त्यामुळे तसे होऊ नये याची जबाबदारी ही व्यवस्थापन म्हणजेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची असते. असे असतानाही हा प्रकार घडणे म्हणजे विद्यार्थी व्यवस्थापनाच्या हाताबाहेर गेल्याचे लक्षण दिसत आहे.


रविवार दिनांक 26 एप्रिल ला हा प्रकार घडला? सकाळी नऊ च्या सुमारास विद्यार्थी वस्तीगृहा बाहेर पडले आणि दुपारी एक वाजेपर्यंत हा प्रकार एका खाजगी खेळाच्या मैदानात झाला. अनेक विद्यार्थ्यांना हा प्रकार सहन न झाल्याने त्यांनी थेट वरिष्ठांकडे ईमेल द्वारे तक्रार केली. एकूणच रॅगिंग हा प्रकार गंभीर असल्यामुळे वरिष्ठांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना तातडीने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यानच्याच काळात काही विद्यार्थ्यांनी ईडी टीव्ही न्यूज शी संपर्क साधून या प्रकाराविषयी किरकोळ माहिती दिली. या प्रकरणाची खात्री करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचल्यानंतर अधिष्ठाता या सुट्टीवर होत्या, आणि त्यांचा पदभार श्रीमती डॉ. कुलकर्णी यांच्याकडे होता. त्यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी असे काही घडलेच नाही असे सांगितले. त्यानंतर घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिल्यानंतर तक्रार आल्यावर दखल घेऊ, पाहू, करू, असे उत्तर मिळाले .त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 28 रोजी अधिष्ठाता डॉ. सय्यद अफरोज फातिमा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीदेखील सुरुवातीला असे काही घडले नाही आणि आमच्याकडे तक्रार आलेली नाही असे म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला .परंतु ज्या वेळेस प्रतिनिधीने सविस्तर माहिती सांगितली त्यावेळेस त्या म्हणाल्या ,की तक्रार आलेली आहे. त्यावर चौकशी समिती नियुक्त केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे जवाब नोंदवणे देखील सुरू आहेआणि सात दिवसात ही चौकशी समिती आपला अहवाल वरिष्ठांना कळवू.
याचसोबत मागील महिन्यामध्ये या इमारतीच्या काही खोल्यांमध्ये प्रार्थना करण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी दिली होती का? या प्रश्नाला गोलमोल उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली. दरम्यान या दोन्ही घटना पाहता व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांवर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.


सविस्तर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com ला भेट द्या!
■आपल्या edtv news या you tube ला सबस्क्राईब करा.
■खलील लिंक वापरून आपल्या व्हाट्सअप्प चॅनल ला कनेक्ट व्हा.https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
■दिलीप पोहनेरकर,
9422219172
