जालना- जालना राजुर रस्त्यावर दिनांक 26 एप्रिल रोजी सळ्या वाहतूक करणारा ट्रक पळविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी जालना शहरातील चार आरोपींना ताब्यात घेतले आहे, आणि अन्य एक फरार आहे. टोल नाक्यावर सीसीटीव्ही बसवलेले असतात आणि या माध्यमातून पोलिसांना लगेच सुगावा लागतो परंतु हा सुगावा लागू नये म्हणून आरोपींनी अनेक गावांमधून वाकडातिकडा प्रवास प्रवास केला आहे .
दरम्यान या गुन्ह्यांमध्ये वापरलेला ट्रक आणि एक चार चाकी वाहन तूर्तास पोलिसांनी जप्त केले आहे. सळ्या कोणाला विकल्या आहेत याचा तपास आता हसनाबाद पोलीस करीत आहेत.
https://youtu.be/aaCt87NMPK0
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा तालुक्यात राहणाऱ्या अलीम बिस्मिल्ला पिंजारी हे जालना येथून ट्रक क्रमांक एम एच 18 एम 31 11 मध्ये सळ्या भरून नंदुरबार कडे जात होते. रात्री 12:30 वाजेच्या सुमारास राजूर रस्त्यावर हॉटेल जानकी समोर त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारणे अडविले आणि ट्रक चालकास मारहाण करून सळ्याने भरलेला ट्रक पळून नेला होता. टोल नाक्यावरून ट्रकची ओळख पटेल त्यामुळे या आरोपींनी हा ट्रक दाभाडी, सोमठाणा, करमाड, पिंपरी राजा ,कचनेर फाटा, पुढे लासुर स्टेशन व परत कचनेर फाटा ,अंबड ,घनसावंगी ,कुंभार पिंपळगाव, मार्गे रांजणी येथे घेऊन गेले .ट्रक सोबत असलेल्या चार चाकी मध्ये ट्रकच्या चालकाला तोंड बांधून बसविले होते त्यामुळे कुठे तक्रार करायलाही चालकाला जागा मिळाली नाही. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी काल दिनांक दोन मे रोजी यातील आरोपी हे छत्रपती संभाजी नगर मार्गे जालन्याला येत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी एक पथक छत्रपती संभाजी नगर येथे पाठवले आणि दुसरे एक पथक करमाड टोल नाक्याजवळ थांबविले. टोलनाक्याच्या पलीकडेच या आरोपींचा पाठलाग करत पोलीस येत असल्याचे आरोपींच्या लक्षात आल्यानंतर हे आरोपी वाहन वेगाने पळू लागले मात्र टोल नाक्याजवळ दबा धरून बसलेल्या स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी बॅरिकेट्स आडवे लावून त्यांना पकडले. या वाहनांमध्ये दिनेश दत्तात्रय पवार वय पंधरा वर्षे राहणार गांधीचमन जालना, शाहिद शकील शेख वय 21 वर्षे राहणार मोदीखाना जालना, तेजस नरेश बिडकर व 23 वर्ष राहणार गोपाळपुरा बडी सडक जालना, सिद्दिकी शेख कौसर वय 22 वर्षे राहणार पेन्शन पुरा जालना, यांना ताब्यात घेतले त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूलही केले आहे. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक पाचवा आरोपी मात्र फरार आहे.
दरम्यान दिनांक 26 एप्रिल रोजी हे पाचही जण रात्री राजुर जालना रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवले आणि त्यानंतर सळईने भरलेला ट्रक लुटण्याचे ठरले. त्या अनुषंगाने हे पाचही आरोपी राजूर जालना रस्त्यावरून भोकरदन कडे जाणाऱ्या वरील ट्रकला त्यांची चार चाकी गाडी आडवी लावून ट्रक थांबवला, ट्रक चालकाला चाकूचा भाग दाखवून त्याचे हात पाय व तोंड बांधले आणि कारमध्ये बसून सळईसह ट्रक पळविला. या गुन्हा मध्ये वापरलेली होंडा सिटी कार, दोन धारदार चाकू, मिरची पूड, पेपर स्प्रे, आणि नगदी 16 हजार 700 रुपये यासह मोबाईल दोन बनावट नंबर प्लेट, एक कार आणि ट्रक असा सुमारे सात लाख 41 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे .दरम्यान ट्रक मधील सळ्या या आरोपींनी कोणाला विकल्या? याचा तपास हसनाबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार या करत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले ,शमूवेेेल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे ,कृष्णा तंगे, आदींचा या पथकामध्ये समावेश होता.या पाच आरोपींपैकी एक आरोपी हा खुनाच्या गुन्हा मध्ये कारागृहात दोन वर्ष शिक्षा भोगून आलेला आहे तर दुसरा एका आरोपीवर पिस्टल सापडल्याचा गुन्हा नोंद आहे.
दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com