जालना- नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग – व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्यामाफर्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे बुधवार, दि. 10 मे 2023 सकाळी 10.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह- जागेवर निवड संधी आयोजित करण्यात आली आहे.


यासाठी कृषीधन सीड्स प्रा.लि. जालना यांची टेक्निकल असिस्टंट पदविका (ॲग्रिकल्चर) साठी, 3 पदे, टेक्निकल पदवीसाठी पदव्युत्तर (ॲग्रिकल्चर) 2 पदे, आणि पिपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि. औरंगाबाद यांची बारावी साठी मशिन ऑपरेटर 50 पदे, व वायर हार्नेस 50 पदे, अशी एकुण 105 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध होणार आहे.
जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या

www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्यास जॉब फेअर या बटनावर क्लिक करुन जालना जिल्हा निवडून त्यातील SPECIAL JOB FAIR- 2 (2023-24) याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पध्दतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान तीन प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दि. 10 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांस्कतिक सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, समोर, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संपत चाटे यांनी केले आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version