जालना- क्रिप्टो करेंसी, गोल्ड डिजिटल कॉइन,GDC, या आभासी चलनामध्ये जालनेकारांनी कोट्यावधी रुपये गुंतविले. या आभासी चलनाचे जालन्याचे प्रमोटर होते त्यांनी या पैशातून जालना सोडून इंदोर, पुणे अशा ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या मालमत्ता देखील जप्त केल्या आहेत. प्रथमदर्शनी हा घोटाळा जरी 9 कोटींचा जवळपास असल्याचे उघडकेस आले असले तरी पोलिसांनी सुमारे 22 कोटींच्या प्रमोटर्सच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. आणि या मालमत्तेची विल्हेवाट लावल्यानंतर गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. आपली गुंतवणूक परत मिळेल या आशेने आता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी डोके वर काढले आहे आणि प्रमोटर्स च्या मागे वसुलीसाठी तगादा लावला आहे. दरम्यान प्रमोटर्स ने आलेल्या गुंतवणुकी मधून मालमत्ता खरेदी केल्या आहेत आणि याच मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या आहेत .त्यामुळे आता गुंतवणूकदारांना जोपर्यंत या मालमत्तांची विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत गुंतवलेला पैसा परत मिळण्याची सुताराम शक्यता नाही. काल तिसरा भागात काही गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या मालमत्तांची माहिती दिली होती उर्वरित प्रमोटर्सनी खरेदी केलेल्या मालमत्तांची यादी पुढीलप्रमाणे.
1)किरण भरतराव खरात जालना, यांनी खरेदीखत क्रमांक 120 दिनांक एक मे 2022 रोजी तत्कालीन महानगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 402 मधील भूखंड 17 18 19 20 असा एकूण 835 चौरस मीटरच्या भूखंडाची रजिस्ट्री केली आहे ज्याची सरकारी किंमत 51 लाख 84 हजार आहे दुसऱ्या खरेदी खतामध्ये खरेदी खत क्रमांक 123 दिनांक मे 2022 रोजी नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 403 मधील एकूण 160 चौरस मीटर असलेल्या भूखंडाची त्यांनी 70 लाख रुपयांमध्ये विक्री केली आहे खरेदी खत क्रमांक 22 83 दिनांक 29 जुलै 2020 रोजी जालना नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 402 मधील भूखंड ज्याचे एकूण क्षेत्रफळ 310 चौरस मीटर आहे ते दत्तूलाल मनालाल अग्रवाल व इतर पाच जणांकडून खरेदी केली आहे ज्याची सरकारी किंमत 18 लाख रुपये आहे चौथ्या प्रकरणात खरेदीखत क्रमांक 17 932 दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी पुणे येथे शिवाजीनगर भांबुर्डा येथील सर्वे नंबर 209 एकूण क्षेत्र 0.33 आर म्हणजेच 3300 चौरस मीटर चा भूखंड युवराज अण्णासाहेब देशमुख राहणार इट जिल्हा उस्मानाबाद यांच्याकडून एक कोटी ५१ लाख रुपयांत खरेदी केला आहे त्याची स्टॅम्प ड्युटी दहा लाख 57 हजार आणि इतर खर्च असा एकूण एक कोटी 61 लाख 87 हजार रुपयांचा हा भूखंड आहे खरेदी खत क्रमांक 19 45 दिनांक 23 जून 2020 रोजी जालना नगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 403 मधील 160 चौरस मीटरची जागा बुलढाणा अर्बन कॉपरेटिव सोसायटी शाखा जालनाला 35 लाखात गहाणखत करून दिले आहे.
2)साबेर घोंची खरेदी खत क्रमांक 754 2022 नुसार साबेर यांनी महेश कुमार व्यंकट गप्पा कमय्या राहणार बनगाव तालुका खामगाव जिल्हा गोंदिया येथील सर्वे नंबर 409 मधील प्लॉट क्रमांक पाच ज्याची किंमत नऊ लाख 40 हजार आहे तो रजिस्ट्री केला आहे खरेदी खत क्रमांक 34 70 2022 यांनी याकूब खान युसुफ खान राहणार जालना यांच्याकडून जालना नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 519 मधील प्लॉट क्रमांक पाचचा दक्षिणेकडील भाग ज्याचे क्षेत्रफळ 423 चौरस मीटर आहे हा खरेदी केला आहे त्याची सरकारी किंमत 15 लाख रुपये आहे.
3)शर्वरी अमोद मेहता इचलकरंजी यांनी खरेदीखत क्रमांक 23 18 2022 रोजी मौजे तारदाळ येथील घोडेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित गट क्रमांक 480 81 83 84 505 506 507 508 509 मधील 2000 चौरस मीटर ची जागा जिची किंमत तीन लाख आहे ती खरेदी केली आहे खरेदी खत क्रमांक 26 42 2021 मोजे यादवराव तालुका सर्व जिल्हा कोल्हापूर गट क्रमांक 473 मधील ग्रामपंचायत शिवारातील प्लॉट क्रमांक 105 मधील तयार घर जे इचलकरंजी रजिस्ट्री कार्यालयाच्या हद्दीमध्ये आहे ते खरेदी केले आहे त्याची सरकारी किंमत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172