Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » तयारी श्रीराम जन्माच्या महोत्सवाची; कोणी आणि कधी केली या मंदिराची स्थापना? काय आहे परंपरा आणि महत्व,पहा
    Jalna District

    तयारी श्रीराम जन्माच्या महोत्सवाची; कोणी आणि कधी केली या मंदिराची स्थापना? काय आहे परंपरा आणि महत्व,पहा

    EdTvBy EdTvMarch 29, 2025No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- झाडांची पालवीगळून नवीन लुसलुशीत पालवी  फुटायला लागली की समजावं चैत्र महिना आला. ठिकठिकाणी आणि सहजासहजी दिसणारा कडुलिंबाचा मोहर याची आठवण करून देतो. किंबहुना चैत्र महिन्याचे ते वैशिष्ट्यच आहे. हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षाची सुरुवात होते आणि त्यासोबतच आणखी एक सुरुवात होते ती रामनवमीच्या महोत्सवाला. जगभरात ठीक ठिकाणी अनेक श्रीरामांची मंदिर आहेत आणि प्रत्येकाचं काही ना काही वेगळं महत्त्व आहे .असंच एक अनन्यसाधारण महत्त्व असलेलं जालन्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेले आनंदवाडी येथील श्रीराम मंदिर.

    महारुद्राचे अवतार समजल्या जाणाऱ्या श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हस्ते येथील श्रीरामांच्या मूर्तींची स्थापना झाली आहे. सुमारे 130 वर्षांपूर्वी त्यावेळी नाम प्रचार करत असताना मिळालेल्या भिक्षेमधून त्याकाळी 60 हजार रुपये खर्च करून श्रीरामांचा सभामंडप म्हणजे मूळ मंदिर उभ करण्यात आलं .आजही अत्यंत सुस्थितीत आणि आकर्षक कलाकृतीचा नमुना असलेले हे मंदिर भाविकांना आकर्षित करतं. 1917 ते 1924 या कार्यकाळात या मंदिरासाठी भिक्षा मागण्यात आली होती .1895 चे चैत्र महिन्यामध्ये श्रीराम ,सीता आणि लक्ष्मणांच्या आकर्षक संगमरवरी मूर्ती आणल्या गेल्या आणि त्यांची स्थापना केली .त्यावेळी पासून इथे आजही अखंड काकड आरती, माध्यम पूजा, उपासना, शेजारती या सेवा सुरू आहेत.

    चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून श्री. रामनवमीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. रोज सकाळी रामायण ,दुपारी महाप्रसाद , दुपारी दीड ते दोन हजार भाविक महाप्रसाद घेतात .सायंकाळी किर्तन, संध्याकाळी श्रीरामांची मिरवणूक, असे भरगच्च कार्यक्रम असतात.  भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून जाते. संध्याकाळी उपासना झाल्यानंतर श्रीरामांच्या मूळ मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरा बाहेर आणल्या जातात. वर्षभर ज्या मूर्तींना आपण दुरून पाहतो त्या मूर्तींचा पदस्पर्श करण्याची संधी या नऊ दिवसात मिळते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री. आनंद सागर महाराज ,श्री. रामानंद महाराज, श्री. प्रल्हाद महाराज यांनी १३ कोटी नामजपंची अनुष्ठाने याच मंदिरात केली आहेत .त्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिराच्या परिसरात गोशाळा ,सभामंडप, बाहेरून येणाऱ्या सद्गुरु भक्तांची निवासाची व्यवस्था आहे. श्रीक्षेत्र गोंदवले येथील संस्थानाच्या नियंत्रणाखाली येथील कामकाज चालते. मंदिराचे महत्त्व, मंदिराचा इतिहास, सांगितला आहे श्रीराम मंदिर संस्थांचे विश्वस्त वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांनी.

    महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
    आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

    # चैत्र शुद्ध प्रतिपदा# श्रीराम जन्मोत्सव# श्रीराम नवमी# ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज # श्रीक्षेत्र गोंदवले# जालना बातम्या#ednews #pfc# आनंदवाडी श्रीराम संस्थान जालना kids गुढीपाडवा हिंदू नववर्ष
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleघराच्या ओढीने गुरुकुल मधून पळून गेलेला विद्यार्थी पुढे झाला प्राचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेखक; कसे वागायचे आजी-माजी आमदार महाविद्यालयात ऐका प्राचार्यांच्या तोंडून
    Next Article महिला व बालकल्याण विभागाच्या जागा निघाल्या, प्रत्येक जिल्ह्याला पाच पदे, दर महिन्याला चाळीस हजार रुपये मानधन
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,008 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,175 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.