जालना- महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आणि वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेले फुगे किंवा काही अवशेष जमिनीवर सापडले तर त्यांना हात लावू नका असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

“टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हैदराबाद” या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी दिनांक एक नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये अवकाशात 10 फुग्यांमध्ये( बलून मध्ये) फ्लाइट्स सोडण्यात येत आहेत. या फुग्यांमध्ये वैज्ञानिक उपकरणे आहेत आणि ठराविक कालावधीनंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशुटसह महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा ,चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव, आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जमिनीवर खाली येण्याची शक्यता आहे .ज्या व्यक्तींना ही उपकरणे दिसतील त्यांनी या उपकरणांना स्पर्श करू नये किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. तसेच अशी उपकरणे दिसल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी , पोस्ट कार्यालयाशी किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी यांनी हे जाहीर आवाहन केले आहे.


या आवाहनात पुढे म्हटले आहे की, अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट हे फुग्यामधून काही उपकरणे सोडत आहे. फुगे पातळ प्लास्टिकच्या फिल्म पासून तयार केलेले आहेत. 50 मीटर ते 85 मीटर व्यासाचे ते असू शकतात .तसेच ते हायड्रोजन वायू ने भरलेले आहेत. संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे फुगे हाती घेतलेल्या प्रयोगानुसार 30 ते 42 किलोमीटर उंची गाठतील अशी शक्यता वर्तवली आहे. हे बोलून हवेत सोडल्यानंतर काही तासांच्या कालावधीनंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशुटसह जमिनीवर खाली येतात सुमारे 20 ते 40 मीटर लांबीच्या एका लांब दोरीवर त्याच्या खाली लटकलेली उपकरणे असलेले पॅराशुट हळूहळू जमिनीवर येतात .ही उपकरणे हैदराबाद पासून सुमारे दोनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या बिंदूवर उतरू शकतील. विशाखापटनम, हैदराबाद, सोलापूर, मार्गावर, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक, आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये हे बलून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील 14 जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
वैज्ञानिक संशोधनासाठी ठेवण्यात आलेली उपकरणे अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्याच्याशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होईल, त्यातील काही उपकरणांवर विजेचा उच्च दाबही असू शकतो तो त्यामुळे त्याच्यासोबत छेडछाड करताना , हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकते .ही उपकरणे जमिनीवर खाली आल्या बाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ ही उपकरणे गोळा करतील आणि ज्या नागरिकाने या उपकरणाबद्दल माहिती दिली त्याला योग्य बक्षीसही मिळेल. त्याच सोबत त्याने माहिती देण्यासाठी केलेला प्रवास खर्च आणि अन्य काही खर्च देखील देण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे ,परंतु माहिती देण्यापूर्वी या उपकरणांसोबत छेडछाड केल्यानंतर मात्र कोणतेही बक्षीस दिल्या जाणार नाही असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी च्या वतीने दिनांक 21 नोव्हेंबर रोजी हे आवाहन करण्यात आले आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version