जालना -जालना शहरातील व्यापारी आणि निलंबित पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये सुरू असलेल्या जमिनीचा वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने ही जागा व्यापारी राठी यांच्या ताब्यात देण्याचा प्रशासनाला आदेश दिला. त्या अनुषंगाने महसूल आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत ही जागा रिकामी करून राठी यांच्या ताब्यात देण्याचा आज प्रयत्न केला. दरम्यान या जागेला विरोध करताना निलंबित पोलीस कर्मचारी श्री. कटके यांच्यासोबत असलेल्या जमावाने वाद घातल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आहे.
जालना शहरात लक्कडकोट भागामध्ये राठी यांच्या मालकीची जागा आहे दरम्यान ही जागा पूर्वीच्या मालकाने राठी आणि अन्य एकाला विकल्याचा वाद सुरू होता हा वाद न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने राठी यांच्या बाजूने निकाल दिला तरी देखील जागा ताब्यात मिळत नसल्याने मध्यंतरीच्या काळात जालना शहरातील व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर अक्षय शिंदे यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती परंतु त्यावर फारसा काही निर्णय झाला नाही त्यामुळे न्यायालयाने ही जागा प्रशासनाने राठे यांच्या ताब्यात द्यावी असा आदेश दिला आणि या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आज दिनांक 17 रोजी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन लक्कडकोट भाग येतील ही जागा रिकामी करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु या जागेवर ताबा असलेल्या श्री .कटके यांनी ही जागा देण्यास विरोध केला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर जमावाने देखील पोलिसांसोबत वाद घातला. परंतु न्यायालयाचा आदेश असल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत सरकारी कामात अडथळा करत असलेल्या श्री. कटके यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com