जालना येणारे सन 2024 हे वर्ष निवडणुकांचे आहे त्यामुळे वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सन 2024 मध्ये जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा लोकसभा या सर्वच संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ लागते आणि वर्ग तीन आणि वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणे त्याचा वापर करणे या सर्व बाबींची या कर्मचाऱ्यांना माहिती आहे त्यामुळे या दोन्ही वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे टाळावे किंवा अपवादात्मक परिस्थितीतच बदली करावी अशा सक्त सूचना राज्याचे अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिनांक 20 जून रोजी हाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हाधिकार्यांना व निवडणूक निर्णय अधिकारी यांना एका पत्राद्वारे दिले आहेत त्यामुळे निवडणुकांचे तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असल्याचे समजायला हरकत नाही.
https://edtvjalna.com
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर, mob 9422219172