Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » रणरागिणी;मामाच्या मुलाचा रुबाब पाहून मी पोलीस झाले! वर्दीची पॉवर इतर नोकरीत नाही- महिला पोलीस सौ.सुमित्रा अंभोरे
    Jalna District

    रणरागिणी;मामाच्या मुलाचा रुबाब पाहून मी पोलीस झाले! वर्दीची पॉवर इतर नोकरीत नाही- महिला पोलीस सौ.सुमित्रा अंभोरे

    EdTvBy EdTvOctober 20, 2023Updated:October 25, 2023No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना – “पोलिसांच्या वर्दी एवढी पॉवर सामान्य नोकरीत नाही , घरी शैक्षणिक वातावरण असताना देखील मामाचा मुलगा मुंबई येथे पोलीस अधिकारी आहे आणि त्याचा रुबाब पाहून  मी पोलिसात भरती झाले. आणि आज समाज सेवा करताना खूप समाधान मिळत आहे असा मनोदय सौ.सुमित्रा अंभोरे-कदम यांनी व्यक्त केला.Edtv News च्या नवरात्रोत्सव “रणरागिणी 2023” चे सहावे पुष्पगुंपताना सौ. सुमित्रा अंभोरे -कदम बोलत होत्या.

    रणरागिणीला प्रतिकिया द्या- 77448 84818

    घरामध्ये सर्वजण उच्चशिक्षित आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतांना त्यांचा  डीएड ला नंबर लागलेला असूनही ते सोडून पोलीस मध्ये भरती होण्यासंदर्भात त्या सांगतात” पोलिसांसारखा रुबाब इतर कोणत्याच नोकरीत नाही, फक्त रुबाबच नाही तर समाजसेवा देखील याच नोकरीमध्ये करण्याची संधी मिळते. कोविडच्या काळात आपण केलेल्या कामाबद्दल मला अभिमान वाटतो ,कारण समाजसेवा करायला संधी मिळाली. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला, या आनंदामध्ये जेवढे समाधान मिळते तेवढे समाधान कुठेही मिळत नाही .काम करायचं वेळापत्रक ठरलेलं नाही, रात्री बे रात्री कुठेही , कधीही जावं लागतं हे माहीत असताना देखील आपण ही नोकरी स्वतःहून स्वीकारलेली आहे .याचा आनंदच आहे .समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी आम्ही मात्र संयम ठेवून हा दृष्टिकोन बदलतो” असेही त्या म्हणाल्या.

    लहानपणाच्या गमतीजमती सांगताना त्यांनी सांगितले की,” बदनापूर तालुक्यात असलेल्या सोमठाणा येथील देवीला आम्ही पायी जात असत ,जत्रेत खर्च करण्यासाठी घरच्यांकडून पैसेही घेतले जायचे परंतु त्यापैकी थोडेच पैसे खर्च करायचे आणि उरलेले पैसे शाळेत आल्यावर लब्दुल( वाळलेली बोरे शिजवून गाड्यावर खाण्यासाठी मिळणारा पदार्थ) खाण्यात घालवायचे.”2012 मध्ये पोलीस प्रशासनात भरती झाल्यानंतर आत्तापर्यंत दामिनी पथकासह इतर विभागातही काम केले आहे, त्यामुळे तपासाचा अनुभव आणि बारकावे लक्षात आले .सध्या पिंक पथकामध्ये त्या कार्यरत आहेत. पिंक पथक म्हणजे ज्या प्रकरणांचा तपास महिलांच्या मदतीने केला जातो. अशा प्रकारचे एक पथक ज्याचा तपास सौ .अंभोरे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करतात .तपास करत असताना डोकं शांत पाहिजे त्यामुळे ताण-तणावाच्या वेळी भटकंती करून तो कमी केला जातो. त्यासोबत मैदानी खेळांची आवड असल्यामुळे त्या एक चांगल्या कबड्डीपटू देखील आहेत .कबड्डीच का ?या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की गावाकडे असताना मैदानी खेळांची आवड लागली या मैदानी खेळांमुळे शरीर सुदृढ राहते, याचाच एक भाग म्हणून आजही व्यायाम शाळेमध्ये जाऊन त्या व्यायाम करतात.  या व्यायामामुळे असलेल्या सुदृढ शरीराचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो असे त्यांचे मत आहे .

    edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. सुरू झाली आहे .रुबाब  दाखविण्यासाठी कोण झाली पोलीस,कोणाला आवडते लाल गोड सेव,कोणती युवती झाली कीर्तनकार,…बरंच कांही.

    दरम्यान नवीन पिढीला सल्ला देताना सौ. अंभोरे म्हणाल्या की, मुलींनी करिअर निवडताना कोण काय सांगेल याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय व्हायचे आहे ,आपल्याला कशात आवड आहे, यावर भर देऊन त्याच क्षेत्रात गेलं पाहिजे. तसेच दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी शरीर देखील सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यावरही भर द्यावा. रणरागिनी चा अवतार हा कधीतरी दाखवावाच लागतो ,कारण पोलीस प्रशासनात काम करत असताना सर्वच गोष्टी या प्रेमाने होत नाहीत, त्यामुळे आरोपींकडून गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी सुंदरीचा( सुंदरी हे पोलीस आरोपींना मार देण्यासाठी वापरतात .गिरणीच्या पट्ट्यासारखा हातभर जाड पट्टा असतो आणि त्याला पाठीमागच्या बाजूने लाकडाची मूठ लावलेली असते. ही मूठ हातात धरून पोलीस आरोपींना फटकेदेतात) वापर करावाच लागतो.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    web-www.edtvjalna.com
    you tube-edtvjalna,App on play store
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    ed jalna police jalna sp lpc ambhore घटस्थापना दुर्गा दुर्गादेवी नवरात्रोत्सव रणरागिणी 2023 सुमित्रा अंभोरे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमी पुन्हा आत्महत्या करणार! जिल्हा उप निबंधक कार्यालयात शेतकऱ्याचा विषपिऊन आत्महत्येचा प्रयत्न
    Next Article भक्ताला दर्शन देण्यासाठी देवीच आली रेणुकाई पिंपळगावमध्ये
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,010 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,176 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.