बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

50 फूट उंच उड्डाण पुलावरून ढाब्यावर कोसळला कंटेनर: दोन ठार

Loading

जालना – हरियाणा राज्यातील भंगार घेऊन आलेला एक कंटेनर शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरात आला .

अंबड चौफुली कडून कदाचित त्याला औद्योगिक वसाहत भागाकडे जायचे असेल .परंतु रस्ता चुकल्याने तो जालना शहरात घुसला आणि नूतन वसाहत जवळील उड्डाण पुलावर चढला. हा पूल ओलांडत असतानाच वळणावर त्याने उड्डाण पुलाचे कठडे तोडून पुलाच्या खाली असलेल्या एकता ढाब्यावर जाऊन कोसळला.

सुदैवाने रात्री अकरा वाजेच्या सुमारास ढाबा बंद होण्याची वेळ होती म्हणून अनेकांचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान या अपघातामध्ये कंटेनर मधील दोघेही ठार झाले आहेत. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हा अपघात एवढा भयानक होता की कंटेनर खाली पडताच मोठा आवाज झाला आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सविस्तर बातमी पहा वरील व्हिडिओमध्ये.

– दिलीप पोहनेरकर,9422219171

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *