बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!

Advertisement

रेवगाव मध्ये आहे ही अनोखी परंपरा!

Loading

जालना- जालना तालुक्यातील रेवगाव येथे असलेल्या संत सद्गुरू प्रेमानंद बाबा मंदिर संस्थानच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची ही अनोखी परंपरा आहे. या परंपरेनुसार मागील 60-70 वर्षांपासून प्रेमानंद बाबांचे भक्त पूर्ण गावभर लोटांगण घेऊन नगर प्रदक्षिणा करतात आणि पुन्हा मंदिरात येतात.

असे मानले जाते की ज्यांनी नवस केला आहे तो नवस  पूर्ण झाल्यानंतर सद्गुरूंच्या प्रती असलेली श्रद्धा अर्पण करण्यासाठी हे लोटांगण घातले जाते. गावभर सडा, रांगोळ्यांनी रस्ते सजवले जातात, फुलांचा वर्षाव होतो.  लोटांगण घेणाऱ्या भक्तांच्या दर्शनासाठी इतरही भक्त सरसावतात.

ही परंपरा जरी नुकतीच सुरू झाली असली तरी सद्गुरू प्रेमानंद बाबा यांच्या हयातीपसून या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आजही अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. हे 133 वर्ष आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोल्डे परिवार हे या कार्यक्रमाचे आयोजन करते. सद्गुरु प्रेमानंद बाबांना  तीन पत्नी, चार मुली, आणि सात मुले होती त्यामुळे त्यांचा परिवार मोठ्या प्रमाणात विस्तारित झाला आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी हा परिवार राहत असला तरी या कार्यक्रमाच्या निमित्यने सर्व नातेवाईक, भाऊकी एकत्र येतात. त्यासोबत प्रत्येक दिवसाचा खर्च हा प्रत्येकी एका -एका भावाला विभागून दिला जातो आणि शेवटच्या महाप्रसादाचा खर्च हा सर्व सामायिक केला जातो. खरंतर गावकऱ्यांची देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असते परंतु तसे होत नाही. जरी खर्चात सहभागी नाही होता आले तरी गावकरी मात्र बाराही महिने या मंदिराशी जोडलेले आहेत. या लोटांगणाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव झटत असते. सद्गुरु प्रेमानंद बाबा यांच्या यांच्या या संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्था देखील कार्यरत आहे.

दिलीप पोहनेरकर,9422219172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *